सन २०१२ पासून संत सावता महाराज यांच्या कृपाशिर्वादाने माळीजगत (www.MaliJagat.Com) या ऑनलाईन वधू वर सूचक केंद्राची सेवा
महाराष्ट्रातील सर्व माळी समाज व त्यांच्या विविध उपसमुदायातील (फुल माळी, जिरे माळी, हळदी माळी, कच माळी, लिंगायत माळी, कासे/गासे माळी)
अविवाहित, घटस्फोटित, विधवा व विधुर उमेदवारांना त्यांच्या योग्य जोडीदाराची निवड करण्यासाठी मदत करते.
माळीजगत हे महाराष्ट्रातील माळी समाजासाठी एक विश्वासार्ह, सुरक्षित आणि आधुनिक ऑनलाईन वधू-वर सूचक केंद्र आहे. आमच्या प्लॅटफॉर्मवर, इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरून स्वतःची सविस्तर माहिती सबमिट करता येते.
आमच्या बॅकएन्ड टीमद्वारे या प्राप्त माहितीची योग्यरीत्या पडताळणी केली जाते आणि त्यानंतरच सदर उमेदवाराची माहिती www.MaliJagat.Com या संकेतस्थळावर प्रकाशित केली जाते.
नोंदणीकृत सर्व उमेदवारांची माहिती पूर्णतः सुरक्षित असून कोणत्याही तृतीय पक्षास ती दिली जात नाही. सर्व उमेदवारांच्या माहितीची गोपनीयता ही आमची प्राथमिकता आहे.
प्रोफाइल सक्रिय झाल्यानंतर, उमेदवारा खालीलप्रमाणे फिल्टर्स वापरून अन्य उपलब्ध उमेदवारांची माहिती पाहू शकतात.
- उमेदवार वधू, वर
- वय
- उपजाती
- शैक्षणिक माहिती
- शहर
आम्ही ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन करतो, ज्यामुळे इच्छुक उमेदवारांना घरबसल्या ऑनलाइन मेळाव्यात सहभागी होता येते व अनुरूप उमेदवारांशी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधण्याची संधी मिळते.
यामुळे ना प्रवासाचा खर्च ना वेळेचा अपव्यय !
वाढत्या घटस्फोटाचे प्रमाण, तसेच प्रथम वधू वर यांना वय शिक्षण तसेच अपेक्षा यामुळे लग्न जमण्यात येणा-या अडचणी यासाठी, आम्ही लग्नपूर्व व लग्नानंतर समुपदेशन सेवा देखील पुरवतो, वैयक्तिक मार्गदर्शन, भावनिक आधार आणि संवाद कौशल्या यांचा वापर करून नात्यात सुसंवाद, समज आणि समाधान टिकवण्यासाठी प्रयत्न करतो.
''आमचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे उमेदवाराच्या गरजेनुसार योग्य जोडीदाराची निवड करणे सोपे करणे आणि त्यांचे वैवाहिक आयुष्य सुखी, सुदृढ बनवणे.''