संपर्क :- 8087206814

ऑनलाईन मेळावा

पारंपारि‍क पध्‍दतीने चालणा-या वधू वर सुचक मेळाव्‍याला पर्याय म्‍हणून घरबसल्‍या आपल्‍या वेळेनुसार सविस्‍तर व अतिशय सोप्‍या पण ऑनलाईन पध्‍दतीने वधू वर परिचय मेळावा दर शनिवारी व रविवारी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत आम्‍ही आयोजित करत आहे व यास माळी बांधवांनी उत्‍तम प्रतिसाद दिला आहे.

यामुळे आपला अमुल्य वेळ व पैसा वाचतो आणि योग्‍य जीवन साथीदाराची निवड करण्‍यास मदत होते.

 

ऑनलाईन वधू वर पहाण्‍याचा कार्यक्रम

जर आपणास काही स्‍थळे पसंत असतील तर आम्‍ही तुमची व त्‍यांची ऑनलाईन भेट घडवून आणतो. त्‍यासाठी दोन्‍ही पक्षांनी 8087206814 या क्रमांकावर आपली भेट घेण्‍याची दिनांक व वेळ पाठवावी. त्‍यानंतर आम्‍ही समोरच्‍या पक्षाला विचारून अनुकुल वेळ ठरवतो व त्‍यावेळेस दोन्‍ही पक्षांना ऑनलाईन समोरासमोर आणले जाते.

या मुळे आपला प्रवासाचा, पाहुणचाराचा खर्च तर वाचतोच तसेच अमुल्‍य वेळ देखील वाचतो व योग्‍य जीवनसाथीदाराची निवड करण्‍यास वेळ व संधी मिळते.