वधू / वर Login

 
     
Forgot Login?   Sign up  

 

संपर्क :- 8087206814, 7769958966

संस्‍थापक मनोगत

''प्रत्येकाचे आयुष्य हे समाजावर आवलंबून आहे. तसेच देशाचे भवितव्य हे समाजातील संस्कांरांवर व एकजुटीवर अवलंबून असते. त्यासाठी समाजात एकजूट असणे आवश्यक आहे मात्र इतर कोणत्याही समाजाशी तुलना किंवा भेदभाव न करता इतर समाजाचा आपण नेहेमी आदरच केला पाहीजे तसेच समाजाची प्रगती हवी असेल तर अगोदर स्वत:मध्ये परिवर्तन घडवून आणणे आवश्यक आहे. आपण आपल्यापासून सुरवात केली व आपण आपला समाज एकजूट केला व असे अनेक समाज एकजूट झाले तर निश्चितच देश बळकट होण्यास वेळ लागणार नाही. संत शिरोमणी सावता महाराज, छ. शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छ.शाहू महाराज, डॉ. आंबेडकर यांनी केवळ एका समाजाचा विचार करून कोणतेही कार्य केलेले नाही तर त्यांनी समाजातील सर्व प्रकारच्या घटकांसाठी शैक्षणिक व सामाजिक बदलासाठी अहोरात्र कार्य केलेले आहे. समाज परिवर्तन केवळ समुदायातील सहविचारांमधील देवाणघेवाणीतूनच शक्य आहे. माळीजगत डॉट कॉम (www.malijagat.com) हा एक विचार आहे, समाजाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जोडण्याचा खटाटोप आहे, आमच्या छोटया छोटया उद्देशातून समाजिक एकोपा वाढीस लागो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना.

Mukund Pehere

मुकुंद किसनराव पेहेरे

कार्यकारी संस्थापक माळी जगत डॉट कॉम www.malijagat.com
कार्यकारी संस्थापक मानसी इन्फोटेक अॅण्ड बीपीओ सर्व्हिसेस www.manasiinfotechbpo.com
कार्यकारी संस्थापक ऑनलाईन नगरमॉल डॉट कॉम www.nagarmall.com
कार्यकारी संस्थापक ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व करिअर स्मार्ट गुरू www.onlinecsg.com